पोस्ट्स

उगवण क्षमता तपासण्याच्या सोप्या पद्धती बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी - ‘एसएओ’ शंकर किरवे यांचे आवाहन

  उगवण क्षमता तपासण्याच्या सोप्या पद्धती बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी -         ‘एसएओ’ शंकर किरवे यांचे आवाहन अकोला, दि. 8 : बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती सोप्या आहेत. तसे तपासून घरचे बियाणे वापरून पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. गोणपाट वापरून उगवण क्षमता कशी तपासावी ? बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मूठभर बियाणे काढा. सर्व पोत्यातून काढलेले बियाणे एकत्र करुन घ्या. गोणपाटाचा चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धूवून घ्या. एक तुकडा जमिनीवर पसरवा. पोत्यातून काढलेल्या बियाण्यातून सरसकट शंभर दाणे मोजून दीड- दोन सेंमी अंतरावर (बोटाचे एक कांडे अंतरावर) दहा-दहाच्या ओळीत गोणपाटाच्या तुकड्यावर रांगेत ठेवावे. अश्या प्रकारे शंभर दाण्यांचा नमुना तयार करावा. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी मारावे. गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यासकट गुंडाळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवावा. त्यावर अधूनमधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. सहा व सात दिवसांनी ही गुंडाळी जम

पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा

  पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा अकोला, दि. 9 : जिल्ह्यात दि. 9 ते 12 मे दरम्यान वादळ, अवकाळी पाऊस, गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेतकरी बांधवांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी साठवणूक, बाजार समितीत माल आणला असल्यास आवश्यक दक्षता घ्यावी. वीज, गारांपासून बचावासाठी सुरक्षित आश्रय घ्यावा. वीज चमकताना मोबाईल बंद ठेवावा. झाडाखाली थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ००

ज्वारी, मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

  ज्वारी, मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू अकोला, दि. 9 : आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावाने ज्वारी, बाजरी व मका खरेदीसाठी शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली असून, ती दि. 31 मेपर्यंत चालू राहील, असे पणन मंडळाचे जिल्हा विपणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी कळवले आहे. जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी व मूर्तिजापूर येथील केंद्रांवरील खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. खरेदीची मुदत दि. 8 मेपासून दि. 30 जूनपर्यंत राहील. ऑनलाईन नोंदणी ‘एनईएमएल’ पोर्टलवर करण्यासाठी ज्वारी, मका, बाजरी आदी पेरा नोंद असलेला सातबारा, आधारलिंक असलेला बँकेचा खाते क्रमांक, आधारकार्डाची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक, तसेच ऑनलाईन नोंदणी करतेवेळी शेतक-यांचे स्वत:चे छायाचित्र घेणे बंधनकारक आहे. पेमेंट प्रणाली पीएएमएस असून, संयुक्त बँक खाते स्वीकारले जाणार नाही. शेतकरी बांधवांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन श्री. शिंगणे यांनी केले. ०००

जिल्ह्यात नाविन्यपूर्ण पीकांचे क्षेत्र वाढवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

    जिल्ह्यात नाविन्यपूर्ण पीकांचे क्षेत्र वाढवा -         जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 9 :   मसालावर्गीय, तेलवर्गीय व नाविन्यपूर्ण पिकांचे मूल्यवर्धन केल्यास पारंपरिक पिकांच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे अशा पीकांचे जिल्ह्यात क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे सांगितले.   कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) नियामक मंडळाच्या नियोजनभवनात आयोजित सभेत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी     बी. वैष्णवी ,    प्रकल्प संचालक   डॉ. मुरली इंगळे,    जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे ,    कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉ.प्रकाश   घाटोळ,   डॉ. उमेश ठाकरे , डॉ. चैतन्य पावशे,   ‘नाबार्ड’ चे जिल्हा व्यवस्थापक श्रीराम वाघमारे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की,   कृषी वसंत अभियानात पिकांचे वैविध्यीकरण होणे आवश्यक आहे. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जिरे ,   ओवा , सोप ,   हळद ,   करडई     व मोहरी आदी मसालावर्गीय व तेलवर्गीय पिकांच्या क्ष

नवोदय विद्यालयातील दोन विद्यार्थ्याची फेलोशिपसाठी निवड

    नवोदय विद्यालयातील दोन विद्यार्थ्याची फेलोशिपसाठी निवड अकोला, दि. 9 : येथील पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या वरद खटे व संघर्ष खंडारे या इयत्ता नववीच्या दोन विद्यार्थ्यांची फ्लेम युनिव्हर्सिटीच्या फेलोशिप कार्यक्रमात निवड झाली आहे. युनिव्हर्सिटीतर्फे ‘सेंटर फॉर नॉलेज अल्टरनेटिव्हज’ जिल्हा फेलाशिप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे संपूर्ण देशातील जिल्हास्तरीय आकडेवारी आणि संस्कृती आदी बाबींचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात प्रकल्पाची सुरूवात होत आहे. या विद्यापीठामार्फत महाराष्ट्रातील एकूण 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.   कार्यक्रमानुसार डिस्ट्रिक्ट फेलो हे जिल्ह्यातील प्रमुख सांस्कृतिक पैलूंच्या दस्तऐवजीकरणासाठी संशोधन करतील. स्थानिकांशी संवाद, विविध स्थळांना भेट आदींद्वारे महत्वाची माहिती गोळा केली जाईल.     सर्वेक्षण, त्यासाठी उपयुक्त साधनांचा विकास, लेखन आणि प्रभावी संज्ञापन, सामाजिक शास्त्रांच्या अनुषंगाने आवश्यक माहिती अशा विविध बाबींचे प्रशिक्षण फेलोंना दिले जाईल.   फेलोशिपसाठी प्राचार्य आर.एस.चंदनशिव, शिक्षक शाम क

शासकीय मुकबधीर विद्यालयात प्रवेश देणे सुरू

  शासकीय मुकबधीर विद्यालयात प्रवेश देणे सुरू अकोला, दि. 9 : शासकीय मुकबधीर विद्यालयात मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्रवेश सुरू आहेत.   प्रवेशासाठी 6 ते 16 वर्षे या वयोगटातील मूकबधीर विद्यार्थी पात्र आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अपंगत्वाचे 40 टक्क्यांवरील प्रमाणपत्र आवश्यक. एकापेक्षा जास्त अपंगत्व नसावे. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. संस्थेत विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांसाठी निवासाची, भोजन, अंथरुण- पांघरुण, तसेच शालेय स्टेशनरी सुविधा पुरविल्या जातील. प्रवेश अर्ज शासकीय मूकबधीर विद्यालय, मलकापुर, अकोला येथे विनामुल्य उपलब्ध आहे. अर्ज दि. 30 जुलैपूर्वी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी समाजकल्याण विभाग (अपंग शाखा), जिल्हा परिषद, अकोला व शासकीय मूकबधीर विद्यालयाशी संपर्क साधावा. ही संस्था मलकापूर येथील महसूल कॉलनीत सिद्धेश्वर मंदिरासमोर आहे. भ्रमणध्वनी   क्र. ८०८७१६७९७२ व ९०२८३९५४४१ ९८५०७७९२६० वरही संपर्क करता येईल. ०००  

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्वतयारी सभा प्रत्येक तालुक्यात 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
  जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्वतयारी सभा प्रत्येक तालुक्यात 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करा -          जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 9 : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला आराखडा दि. 20 मेपूर्वी सादर करावा व संबंधित विभागांकडून, तसेच प्रत्येक तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष दि. 1 जूनपासून सुरू करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. मान्सून पूर्वतयारी सभा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, विविध यंत्रणांचे अधिकारी, तसेच आपत्ती व्यवस्थापन समन्वय अधिकारी संदीप साबळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, आरोग्य विभाग,पाटबंधारे विभाग, सा. बांधकाम विभाग, महापालिका, नगरपालिका, तहसील कार्यालय आदींनी दि. 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेली यंत्रणा व साधने सुस्थितीत असल्याबाबत खातरजम

महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रातर्फे सशुल्क ब्युटीपार्लर प्रशिक्षण कार्यक्रम

  महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रातर्फे सशुल्क ब्युटीपार्लर प्रशिक्षण कार्यक्रम अकोला, दि. 6 : महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रातर्फे सशुल्क ब्युटीपार्लर प्रशिक्षण कार्यक्रम दि. 20 मेपासून सुरू होणार आहे. त्यासाठी दि. 16 मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वयोगट 18 ते 45 वर्षांदरम्यान व दहावी उत्तीर्ण व्यक्तीला प्रवेश मिळू शकेल. प्रशिक्षणात ब्युटीपार्लर, केशरचना, मेकअप आदी बाबी प्रात्यक्षिकांसह शिकवल्या जातील. त्याशिवाय, व्यक्तिमत्व विकास, उद्योग नोंदणी, बाजारपेठ पाहणी, कर्ज प्रक्रिया व विविध योजनांची माहिती दिली जाईल. अधिक माहितीसाठी कल्याणी तिजारे यांच्याशी 9822391337 व वृषाली काळणे यांच्याशी 9373996027 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे व प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी केले आहे. ०००

अतिवेगाने चालणा-या वाहनांवर करणार कारवाई ‘आरटीओ’च्या तपासणी यंत्रणेत अत्याधुनिक वाहनांची भर

  अतिवेगाने चालणा-या वाहनांवर करणार कारवाई ‘आरटीओ’च्या तपासणी यंत्रणेत अत्याधुनिक वाहनांची भर अकोला, दि. 6 : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तपासणी यंत्रणेत 3 इंटरसेप्टर वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात सदोष वाहन तपासणी, तसेच अतिवेगाने चालणा-या व नियमभंग करणा-या वाहनधारकांवर कारवाईला वेग येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली. तपासणी ताफ्यात 3 वाहनांची भर पडल्याने आता एकूण 4 इंटरसेप्टर वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यात स्पीड गन, ब्रेथ ॲनालायझर, टायर ट्रेंड ग्रेज ही उपकरणे उपलब्ध आहेत. स्पीड गनद्वारे अतिवेगातील वाहनांवर, तसेच ब्रेथ ॲनालायझरच्या तपासणीद्वारे दारु पिऊन वाहन चालविणा-यांवर कारवाई करण्यात येईल. या वाहनांतील लेझर कॅमे-याद्वारे तपासणीतून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवरही कारवाई करण्यात येईल, असे श्रीमती दुतोंडे यांनी सांगितले. वाहनांतील उपकरणे अद्ययावत व तंत्रदृष्ट्या अधिक प्रभावी आहेत. त्यामुळे वाहतुकीत दोषी आढळणा-या वाहनांची तत्काळ नोंद होऊन वाहनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश जाईल. अपघात टाळण्यासाठी व आपल्या सर्वांच्या सुरक्षितते

बालगृहातील मुलांना योगशास्त्राचे धडे

बालगृहातील मुलांना योगशास्त्राचे धडे   अकोला, दि. 6 :  महिला व बाल विकास विभाग, बालकल्याण समिती व शुभोदय फौंडेशनतर्फे शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह येथे मुलांसाठी उन्हाळी दहा दिवसीय शिबिराचा शुभारंभ शनिवारी (4 मे) झाला. शुभारंभाच्या दिवशी विद्यार्थ्यांना योगशास्त्राची माहिती व प्रात्यक्षिकाद्वारे योगासने शिकविण्यात आली.   राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड.अनिता गुरव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, समितीचे सदस्य राजेश देशमुख, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी राजू लाडुरकर, संरक्षण अधिकारी सुनील लाडूरकर, शुभोदय फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिरभाते आदी उपस्थित होते. श्री. पुसदकर, श्रीमती गुरव मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुलांना योगाचे महत्त्व समजून सांगण्यात आले. मुलांनी उत्साहाने योग प्रात्यक्षिकांत सहभाग घेतला.  हर्षाली गजभिये यांनी समन्वय साधला. जयश्री वाडे यांनी आभार मानले. शुभोदय फाउंडेशन, सिटी चाईल्डलाईन    विद्या उंबरकर,शरयू तळेगावकर,राजेश मनवर,रोहित भाकरे,वैभव भदे, अरुणा अंभोरे, तसेच   रेल्वे चाईल्ड ल